'जगण्याने छळले होते...'; वार्धक्य आणि एकटेपणामुळे ७० वर्षीय वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 06:40 PM2020-10-14T18:40:31+5:302020-10-14T18:41:16+5:30
70-year-old commits suicide वार्धक्य आणि स्वतःचे मुलबाळ नसल्याने संपवली जीवन यात्रा
पाथरी : वार्धक्य आणि पत्नीच्या निधनानंतरचा जवळपास २५ वर्षाचा एकटेपणा यामुळे कंटाळलेल्या एका वृद्धाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ( दि. १३ ) सायंकाळी उघडकीस आली. आश्रोबा निवृती चव्हाण असे मृत वृद्धाचे नाव आहे. वार्धक्य आणि स्वतःचे मुलबाळ नसल्याने आलेला एकटेपणा यामुळे त्यांनी जीवन यात्रा संपवल्याचे त्यांचा सांभाळ करणाऱ्या पुतण्याने सांगितले.
आश्रोबा चव्हाण हे सेलू तालूक्यातील खवणेपिंप्री येथील रहिवासी होते. त्यांच्या पत्नीचे जवळपास २५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना मुलबाळ नसल्याने ते पुतण्यासोबत राहत होते. त्यांना शेत जमीन ही नव्हती. वय वाढत असल्याने शरीर साथ देत नव्हते. तसेच मूलबाळ नसल्याने त्यांना एकटेपणा आला होता. यातूनच त्यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजेदरम्यान घरात एकटे असताना लोखंडी पाईपच्या आडूला गळ्यातील रुमालाने गळफास घेत आत्महत्या केली. ग्रामस्थांनी याची माहिती त्यांचा पुतण्या निवृत्ती मारूती चव्हाण यांना दिली. सदरील गाव पाथरी पोलिस पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने निवृत्ती चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ ऑक्टोबर पहाटे १ वा . याप्रकरणी आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर तिघांवर पाचोरा येथे उपचार सुरु आहेतhttps://t.co/6wEYSTRmua
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 14, 2020