परभणीत 'आयएमए'कडून डॉक्टरांची रॅली; कोलकत्ता येथील घटनेचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:03 PM2019-06-17T15:03:31+5:302019-06-17T15:17:26+5:30
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
परभणी- पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिशएनच्या परभणी येथील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातून रॅली काढून पोलीस अधीक्षकांना सदरील घटनेच्या निषेधाचे निवेदन दिले.
परभणी शहरातील खाजगी डॉक्टर्स सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशनरोड, डॉक्टरलेन, नारायणचाळ मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयावर रॅली काढण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये कोलकत्ता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच या घटनेची आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ.परमेश्वर साळवे, सचिव डॉ.अमिताभ कडतन, डॉ. गोपाल जवादे, डॉ.भक्कड, डॉ.मीना परतानी, डॉ. विद्या चौधरी, डॉ. राजू सुरवसे, डॉ. विवेक नावंदर, डॉ.श्रीकांत मणियार, डॉ.विकास धर्माधिकारी, डॉ.सुधीर काकडे, डॉ.सुधांशू देशमुख, डॉ.भूतडा आदींची उपस्थिती होती.