स्वतंत्र फीडरमुळे ५० गावांचा मिटला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:25+5:302021-01-08T04:51:25+5:30

परभणी : महावितरण कंपनीने स्वतंत्र फीडरची योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे या फीडरवरील ५० गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला ...

Independent feeders solve the problem of 50 villages | स्वतंत्र फीडरमुळे ५० गावांचा मिटला प्रश्न

स्वतंत्र फीडरमुळे ५० गावांचा मिटला प्रश्न

Next

परभणी : महावितरण कंपनीने स्वतंत्र फीडरची योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे या फीडरवरील ५० गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता रबी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

येथील १३२ के.व्ही. उपकेंद्रातून उपलब्ध असलेल्या एकमेव वाहिनीवरून जवळपास ५० गावांना वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यात ७ उपकेंद्रे व परभणी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा एकाच लाइनवरून असल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. विद्युत पुरवठा करणाऱ्या फीडरची विभागणी करावी, अशी मागणी धर्मापुरी, टाकळी कुंभकर्ण, झरी, टाकळी या भागातील शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन आ. डॉ. राहुल पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातले. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता कैलास जमदाडे, ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र मानकर, सहायक अभियंता नितनवरे आदींसोबत बैठक घेऊन हा महत्त्वाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना आ. डॉ. राहुल पाटील यांनी केल्या होत्या. तसेच या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे धर्मापुरी, टाकळी कुंभकर्ण, झरी, टाकळी बोबडे अशी स्वतंत्र फीडर योजना महावितरणने कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ५० गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

शेतकऱ्यांनी केला सत्कार

तालुक्यातील ५० गावांतील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने ४ जानेवारी रोजी आ. डॉ. राहुल पाटील यांचा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख सदाशिवराव देशमुख, तालुका प्रमुख नंदू पाटील, तुकाराम मुळे, सुंदरराव देशमुख, बबनराव सामाले, खाजा काजी, बालासाहेब कदम, प्रसादराव आरमळ, अच्युतराव सामाले, एकनाथराव देशमुख, गंगाधरराव मोरे, भास्करराव देवडे, गोपाळ सामाले, गजाननराव देशमुख आदींची उपस्थिती होती. प्रल्हाद देवडे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: Independent feeders solve the problem of 50 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.