९७ हजार नागरिकांच्या जिल्ह्यात तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:09+5:302021-01-13T04:43:09+5:30
एका दिवसात ४ हजार ९०० जणांची तपासणी परभणी : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्यात आल्या असून, मंगळवारी दिवसभरात ४ हजार ...
एका दिवसात ४ हजार ९०० जणांची तपासणी
परभणी : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्यात आल्या असून, मंगळवारी दिवसभरात ४ हजार ९९७ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील १ हजार ५३३ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. ग्रामीण भागात परभणी तालुक्यात ९६६, गंगाखेड तालुक्यात १६९, पालम ५७, सोनपेठ ६, पाथरी ७, सेलू २६ आणि मानवत तालुक्यात ३८, जिंतूर ३४ आणि बोरी येथे ४६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
४२ रुग्णांवर घरीच उपचार
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, रुग्णालयातील रुग्णांची संख्याही घटली आहे. ४२ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे आयटीआय हॉस्पिटलमध्ये १६, सेलू उपजिल्हा रुग्णालयात १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात २ आणि ४१ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.