वालूर येथील वास्तूशिल्प, मूर्ती, बारवेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:45+5:302021-03-05T04:17:45+5:30
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे ३ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ अभ्यास गटाकडून गावातील वास्तूशिल्प, मूर्ती ...
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे ३ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ अभ्यास गटाकडून गावातील वास्तूशिल्प, मूर्ती व बारवेची पाहणी करण्यात आली. वालूर येथे दिनांक २ ते ५ मार्च या कालावधीत या अभ्यास गटातील तज्ज्ञांनी वालूर ग्रामदैवत ऋषी वाल्मिकी मंदिर, बारव, विष्णू, गणपती आदी देवतांची पाहणी केली. त्याचबरोबर विविध ठिकाणी उत्खननात सापडलेल्या भग्नावस्थेत असलेल्या मूर्तींची पाहणीही केली. यावेळी विविध माहिती या गटाने संकलित केली. या पथकात मल्हारीकांत देशमुख, अनिल स्वामी, नितीन बावळे, शशिकांत चिलवत, संतोष तळेकर, नारायण डुमे, मधुकर क्षीरसागर, संतोष लव्हाळे, राजेभाऊ पवार, शंकरआप्पा खेरडकर, काशीनाथ आरे, रामआप्पा आरे, रमाकांत चौधरी, ॲड. संदीप डाके, बालाजी हरकळ आदींचा समावेश होता.