बंद कारखान्यातील साडेतीन लाखांचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:22+5:302021-08-27T04:22:22+5:30
सेलू येथील मयूर सुभाषचंद्र बिनायके यांचा शहरातील सेलू ते पाथरी रस्त्यावर अरिहंत इंडस्ट्रीज नावाचा कारखाना आहे. हा कारखाना बंद ...
सेलू येथील मयूर सुभाषचंद्र बिनायके यांचा शहरातील सेलू ते पाथरी रस्त्यावर अरिहंत इंडस्ट्रीज नावाचा कारखाना आहे. हा कारखाना बंद असून तो चालू करण्याच्या अनुषंगाने त्यांनी २१ ऑगस्ट रोजी पाहणी केली होती. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या कारखान्याच्या संरक्षण भिंतीचे गेट उघडे असून, आतील काही खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती त्यांना त्यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या व्यक्तीने दिली. त्यावरून बिनायके यांनी कारखान्यात जाऊन पाहिले असता कारखान्याच्या भिंतीवरील एका टीन पत्र्याचे नट बोल्ट काढून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर आतील २५ एचपीची एक मोटार, १५ एचपी एक मोटार, एक एचपीच्या 9 मोटारी, दोन एचपीच्या पाच मोटारी, तसेच ५ एचपीची एक मोटार असे ३ लाख ५० हजारांचे साहित्य चोरून नेल्याचे दिसून आले. याबाबत मयूर बिनायके यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.