पालम : जोरदार पाऊस पडल्यामुळे दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास लेन्डी नदीला पूर आल्याने ८ गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे. मोठा पूर असल्याने दिवसभर हा रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.
पालमजवळील लेन्डी नदी पात्रातील कमी उंचीचा पूल ८ गावांसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे मागील महिन्यात तर हा रस्ता तबल २१ वेळा बंद होऊन गावांचा संपर्क तुटला होता. आरखेड, घोडा, सोमेश्वर, फळा, उमरथडी या गावांचा संपर्क तुटला असून पालम ते पुयणी रस्त्यावर पूल पाण्याखाली गेल्याने पुयणी, आडगाव, वनभूजवाडी याही गावांचासंपर्क तुटला. पुलावरून २० फुट पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतूकीसाठी पूर्ण पणे बंद झाला आहे. त्यामुळे प्रवासी नदीकाठी पूर ओसरण्याची प्रतीक्षा करीत बसले होते.