उमेदवार कोरोना चाचणी अहवालाच्या प्रतीक्षेत
देवगावफाटा: ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या सूचनेप्रमाणे सेलू तहसील कार्यालयात तालूका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांच्या पथकाने १ हजार ११६ उमेदवारांचे आरटीपीसीआर स्वॅब चाचणी घेतली असून आता या उमेदवारांना अहवाल येण्याची प्रतीक्षा लागली आहे.
ग्रामीण भागात विजबिल वाटपात सुसूत्रता आणावी
देवगावफाटा: सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या वतीने ग्राहकांना दरमहा विज बिले वाटप होत नाहीत.शिवाय दरमहा रिडींग घेतली जात नसल्याने ॲव्हरेज बिल आकारणी होत असल्याने ग्रामीण भागात वीज देयकाच्या बाबतीत सुसूत्रता आणणे गरजेचे आहे.
अरूंद पूल बनला अपघाताचे केंंद्र
देवगावफाटा: देवगावफाटा - जिंतूर रस्त्यावर देवगावफाटा येथे करपरा नदीवरील निजामकालीन पूल हा अरूंद असून या पुलाच्या भिंतीला तडे गेल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.वळण रस्ता असल्याने या पुलाचा चालकांना नेमका अंदाज येत नाही एकंदरीत हा पूल अपघाताचे केंद्रबिंदू बनला आहे.
कर्मचाऱ्यांचे रात्री जागरण
देवगावफाटा: ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान निवडणूक निर्वाचन अधिकारी यांना सकाळी साहित्य देणे व सायंकाळी ५ वाजता परत घेणे व त्यानंतर माहिती संकलन करणे व अहवाल वरिष्ठांना कळविणे या कामासाठी कर्मचाऱ्यांना रात्री १२ ते २ वाजेपर्यंत जागरण करावे लागत आहे.