परभणीत हमालांपाठोपाठ व्यापाºयांच्या बंदमुळे मोंढा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:42 AM2017-11-28T00:42:54+5:302017-11-28T00:43:03+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ५ दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला असून, आता त्यापाठोपाठ सोमवारी व्यापाºयांनीही या मागणीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारल्याने मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत़

Manda jam due to closure of merchandise after Parbhaniit hamalampa | परभणीत हमालांपाठोपाठ व्यापाºयांच्या बंदमुळे मोंढा ठप्प

परभणीत हमालांपाठोपाठ व्यापाºयांच्या बंदमुळे मोंढा ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ५ दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला असून, आता त्यापाठोपाठ सोमवारी व्यापाºयांनीही या मागणीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारल्याने मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत़
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकºयांचा कृषीमाल व्यापारी खरेदी करतात़ या परिसरात असलेल्या हमाल कामगारांनी २२ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे़ परभणी जिल्ह्यात माथाडी बोर्ड स्थापन झाले असून, माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी हमाल संपावर गेले आहेत़ तर माथाडी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारपासून मोंढ्यातील व्यापाºयांनीही बेमुदत बंद पुकारला आहे़ त्यामुळे आठ दिवसांपासून येथील व्यवहार पूर्णत: ठप्प झाला आहे़ माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हमाल मापाडी कामगारांनी मोंढा परिसरातून सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोर्चा काढला़ कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत हा मोर्चा नवा मोंढा, गव्हाणे चौक, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊन हमाल कामगारांनी आपली मागणी पुन्हा एकदा रेटून धरली आहे़ हमाल कामगारांनी बंद पुकारल्याने मोंढा बाजारपेठेबरोबरच जिनिंग प्रेसिंग आणि एमआयडीसीतील आॅईलमिल व इतर कारखान्यांवर परिणाम झाला आहे़ दुसरीकडे मोंढ्यातील व्यापाºयांनी देखील सोमवारी सकाळपासूनच बंद पुकारला़ त्यामुळे मोंढा बाजारपेठेतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीट बंद ठेवण्यात आली़ व्यापाºयांनी सकाळी बाजारपेठ परिसरातून पदयात्रा काढून आपली मागणी लावून धरली़ तत्पूर्वी बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर यांना व्यापाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे़
व्यापाºयांच्या बंदमुळे पाच दिवसापर्यंत काही प्रमाणात असलेली मोंढ्यातील उलाढाल सोमवारी पूर्णत: ठप्प झालीे़
सध्या कापूस, सोयाबीन, विक्रीला आला आहे़ मात्र संपूर्ण बाजारपेठच बंद असल्याने शेतकºयांना कृषीमाल विक्रीसाठी आता अडचणींचा सामना करावा लागत आहे़

Web Title: Manda jam due to closure of merchandise after Parbhaniit hamalampa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.