सोनपेठ येथे मराठा समाजाचे धरणे आंदोलन; परळीतील आंदोलकांना दिला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 06:21 PM2018-07-19T18:21:06+5:302018-07-19T18:22:16+5:30
मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी येथे बुधवारी ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत आज सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
सोनपेठ (परभणी ) : मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी येथे बुधवारी ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत आज सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार जिवराज डापकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर नगरसेवक अॅड.श्रीकांत विटेकर,नारायण रोडे,आजित देशमुख, आमोल गांगर्डे, संतोष गव्हाने, किशोर कनसे ,गोकुळ आरबाड, बालासाहेब इंगोले, राजेभाऊ हुंबे, महेश परांडे, अभिजित लोमटे,अर्जुन इंगळे, अनिल झिरपे, शिवराज जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.