यावेळी त्यांनी जिंतूर-परभणी रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून अतिशय संथगतीने चालू असून, दर पावसाळ्यात या मार्गावरून वाहतूक करण्यास प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग ७५२-१ वाटूर-देवगाव-चारठाणा पाटी-जिंतूर-औंढा-शिरडशहापूर या ९७ कि.मी. लांबीपैकी २७ किमी वाटूर ते चारठाणा पाटीपर्यंतच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ७० कि.मी. रस्त्यास मंजुरी देण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली. हा ७० कि.मी.चा मार्ग झाल्यास बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र राष्ट्रीय माहामार्गाशी जोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच रा.मा.क्र. ५४८-बी देवगाव-सेलु-पाथरी-इंजेगाव हा महामार्ग सेलू शहरातून जातो. सेलूमध्ये मराठवाड्यात नावाजलेले नूतन महाविद्यालय ही शिक्षण संस्था आहे. येथे शिक्षणासाठी मराठवाड्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. शिवाय येथून परळीकडे रस्ता जातो. त्यामुळे भाविक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या हितासाठी या रस्त्यास मंजुरी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व कामांना तत्काळ मंजूरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे आ. बोर्डीकर यांनी सांगितले.
मेघना बोर्डीकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:14 AM