तडजोडीचे दाेन हजार भरण्यास नकार देणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:59+5:302021-07-20T04:13:59+5:30
सेलू येथील एका व्यक्तीविरोधात दीड वर्षानंतर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या एका पथकाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी ...
सेलू येथील एका व्यक्तीविरोधात दीड वर्षानंतर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या एका पथकाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी सेलू येथील गुलमोहर काॅलनी भागातील राशिद खान जब्बार खान यांच्या घरातील विद्युत मीटरची तपासणी केली असता हे मीटर मंदी गतीने सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे मीटर पंचनामा करून जप्त करण्यात आले. तसेच तज्ज्ञामार्फत मीटरची तपासणी केली असता मीटरच्या अंतर्गत भागात छेडछाड करून वीज चोरी करण्यात येत असल्याचे दिसून आले. याबाबत आरोपी राशिद खान जब्बार खान यांनी २४ महिन्यात २६ हजार १४० रुपयांचे वीज चोरी केली. तसेच २ हजार तडजोड रक्कम अशी एकूण २८ हजार १४० रुपयांच्या रकमेचे बिल त्यास भरण्याकरिता देण्यात आले. त्यातील २६ हजार १४० रुपये आरोपी राशिद खान जब्बार खान याने १९ ऑक्टोबर २०२० रोजी महावितरणकडे भरले ; परंतु तडजोडीची २ हजारांची रक्कम भरली नाही. याबाबत खान यांनी २८ हजार १४० रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद महावितरणचे कर्मचारी पप्पू नवनाथ गोरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात १८ जुलै रोजी दिली. त्यावरून आरोपी राशिद खान जब्बार खान याच्या विरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.