ऑनलाइन प्रक्रियेमुळे कापूस खरेदी ठरली सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:22+5:302021-01-16T04:20:22+5:30

पाथरी : ऑनलाइन कापूस नोंदणी या वर्षी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू लागली आहे. तालुक्यात एक महिन्यात ५४ हजार ३४० ...

Online processing makes buying cotton easier | ऑनलाइन प्रक्रियेमुळे कापूस खरेदी ठरली सुलभ

ऑनलाइन प्रक्रियेमुळे कापूस खरेदी ठरली सुलभ

Next

पाथरी : ऑनलाइन कापूस नोंदणी या वर्षी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू लागली आहे. तालुक्यात एक महिन्यात ५४ हजार ३४० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, खरेदीची प्रक्रिया सुलभ झाल्याने उत्पादकांचीही गैरसोय टळली आहे.

गतवर्षी कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. कापूस खरेदी बंद झाल्याने, याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. मात्र, शासनाने यावर तोडगा काढत महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या शासकीय कापूस खरेदीसाठी ऑनलाइन कापूस नोंदणी प्रक्रिया राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादीप्रमाणे आपला कापूस मार्केट यार्डात आणून वेळेत विक्री करणे शक्य झाले होते.

राज्य शासनाने या वर्षीही ऑनलाइन नोंदणीची हीच प्रक्रिया राबविली आहे. पणन महासंघाच्या शासकीय कापूस खरेदीसाठी बाजार समितीमार्फत नोंदणी केली जात आहे. ३ डिसेंबरपासून तालुक्यात कापूस खरेदीस सुरू करण्यात आली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत मोबाइलवर संदेश पाठवून खरेदीसाठी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, संदेश पाठविलेलेच शेतकरी केंद्रावर आले. परिणामी, शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर चार-चार दिवस ताटकळत थांबण्याची गरज भासली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय आणि आर्थिक नुकसान टळले आहे. बाजार समितीकडे आतापर्यंत ८ हजार ६०५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ हजार ९५० शेतकऱ्यांचा ५४ हजार ५५० क्विंटल कापूस पणन महासंघाने खरेदी केला आहे.

Web Title: Online processing makes buying cotton easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.