या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन सादरीकरण केले जाणार आहे. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रा.डॉ.कीर्तिकुमार मोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कृष्णा दळणर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बा.बा. कोटंबे, डॉ.विठ्ठल जंबाले, प्राचार्य डॉ.उत्तम देवकते आदी उपस्थित राहणार आहेत. २० जानेवारी रोजी ‘आदिवासी बोली आणि संवर्धन’ या विषयावर डॉ.पंजाब शेरे, २१ जानेवारी रोजी ‘प्रज्ञावंतांच्या दृष्टीतून मराठी’ या विषयावर प्रा.डॉ.रवींद्र बेंबरे, २२ रोजी ‘बोली भाषेच्या ऱ्हासाची कारणे आणि उपाय’ या विषयावर अशोक उफाडे, २३ रोजी ‘मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन’ विषयावर प्रा.बालाजी भंडारे, २५ रोजी ‘सोशल मीडियात मराठीचा वापर’ या विषयावर मंगेश भालेराव यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. २७ जानेवारी रोजी कविसंमेलन होत असून, त्यात प्रा.डॉ.दीनानाथ फुलवाडकर यांच्यासह कवी का.रा. चव्हाण, आत्माराम जाधव, अविनाश कासांडे, राजेश येवले, यशवंत मस्के, रामेश्वर किरडे, अशोक केंद्रे, मुंजाजी इंगोले, महेश कोरडे, माधव सुरनर, शिवशंकर डोईजड, दुर्गानंद वाळवंटे, नरसिंगदास बंग, अरविंद सगर आदी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.संतोष हंकारे, डॉ.श्रीहरी चव्हाण यांनी केले आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:19 AM