पालममध्ये ना रंगरंगोटी, ना सूचनांचे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:21+5:302021-01-13T04:42:21+5:30
पालम : शहरात राष्ट्रीय मार्गावर असलेल्या रस्ता दूभाजकांची दयनीय आवस्था झाली आहे. रंगरंगोटी नसल्याने हा दूभाजक लक्षात येत नसून, ...
पालम : शहरात राष्ट्रीय मार्गावर असलेल्या रस्ता दूभाजकांची दयनीय आवस्था झाली आहे. रंगरंगोटी नसल्याने हा दूभाजक लक्षात येत नसून, एकही सूचनांचे फलक नसल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे.
पालम शहरातून गंगाखेड ते लोहा हा राष्ट्रीय मार्ग जातो रात्रंदिवस या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावर शहरात मुख्य चौक, बसस्थानक ते लोहा रस्ता पर्यंत रस्ता दूभाजक बसविण्यात आला आहे. या दूभाजकाचा रंग पूर्ण त उजाला असून धुळीचे थर चढला आहे. दूभाजक सुरू होताना कोणत्याही सूचना देणारे फलक नाहीत. त्यामुळे भरधाव येणारी वाहने दूभाजकावर चढून अपघात होत आहेत. तसेच रस्ता च्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढल्याने वाहन चालकांना त्रास वाढला आहे. राष्ट्रीय मार्ग असूनही दूभाजकाची वाताहत सुरू आहे.