परभणी: रेशन दुकानदारांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:29 AM2018-01-20T00:29:41+5:302018-01-20T00:30:11+5:30
सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी शिधापत्रिकांना आधार जोडणी सक्तीची केली आहे़ तालुक्यात आधार जोडणीच्या कामात दिरंगाई करणाºया रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी शिधापत्रिकांना आधार जोडणी सक्तीची केली आहे़ तालुक्यात आधार जोडणीच्या कामात दिरंगाई करणाºया रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली़
अन्नधान्याच्या वितरणामध्ये पारदर्शकता आणण्याकरीता शिधापत्रिकेला आधार जोडणीची मोहीम पाथरी तालुक्यात हाती घेण्यात आली आहे़ तालुक्यात ५ हजार शिधापत्रिका आधारविना असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध केल होते़ या वृत्ताची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांनी १९ जानेवारी रोजी तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदारांची येथील तहसील कार्यालयात बैठक घेतली़ यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मांडवगडे, तहसीलदार देविदास शिंदे, नायब तहसीलदार निलेश पळसकर, मुक्तार डांगे आदींची उपस्थिती होती़ तालुक्यात आधार जोडणीचे काम संथगतीने सुरू असून, हे काम वेळेच्या आत झाले पाहिजे़ आधार जोडणी झाली नाही तर लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाणार नाही़ कामात चालढकल केल्यास कारवाई करण्याचा इशारा पिनाटे यांनी यावेळी दिला.