परभणी : मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांची झाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:53 AM2019-05-24T00:53:36+5:302019-05-24T00:53:59+5:30

परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार पार पडली. मतमोजणी दरम्यान प्रशासकीय दिरंगाईमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची काहीशी धांदल झाल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे धावपळीत भर पडली.

Parbhani: After delays in declaration of results after counting of votes, | परभणी : मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांची झाली धावपळ

परभणी : मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांची झाली धावपळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार पार पडली. मतमोजणी दरम्यान प्रशासकीय दिरंगाईमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची काहीशी धांदल झाल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे धावपळीत भर पडली.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीलाच टपाली मते मोजली खरी . मात्र या मतांचा निकाल सर्वात शेवटी जाहीर केला. त्यामुळे सुरुवातीचा साधारणत: दीड तास कुठलाही निकाल समोर आला नाही. इतर ठिकाणाहून निकालाचे अपडेट येत असताना परभणीत मात्र नागरिकांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली. ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारणत: दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या फेरीचा अधिकृ निकाल जाहीर झाला. त्यामुळे सकाळी १० नंतरच निकालेच अपडेट मिळू लागले. त्यातही अधिकृत निकाल जाहीर करण्यासाठी सातत्याने विलंब होत असल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल हाती येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना निकाल काय आहे तो समजू लागला. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना निकालाची अपडेट माहिती देताना अडचणी निर्माण झाल्या.
विशेष म्हणजे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने १२ फेऱ्यांचा अधिकृत निकाल जाहीर केला असतानाच इकडे मात्र मतमोजणीच्या प्रत्यक्ष कक्षातून उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे संपूर्ण निकाल स्पष्ट झाला होता. एकूण २९ फेºयांमध्ये या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारासच निकाल स्पष्ट झाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला. मात्र तोपर्यंत केवळ १२ व्या फेरीचीच अधिकृत घोषणा झाली होती. नेमके किती मतांनी खा. बंडू जाधव विजयी झाले हे स्पष्ट झाले नाही. सर्व फेºयांचे निकाल हाती येण्यासाठी रात्री ८ ची प्रतीक्षा करावी लागली. प्रशासनाने निकालासाठी दिलेल्या सुविधांचाही अभाव दिसून आला. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाºयांना जेवणासाठी काही वेळ ताटकळतही उभा रहावे लागले. तसेच पाण्याचीही सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याने कर्मचाºयांबरोबरच उमेदवारांचे प्रतिनिधी, सुरक्षा रक्षकांचीही धावपळ झाल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास
प्रशासनाने तीन ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था केली होती. मात्र सावलीची व्यवस्था केली नाही. त्यामुळे कडक उन्हामध्ये थांबून कार्यकर्त्यांना निकाल ऐकावा लागला. काही कार्यकर्त्यांनी झाडाचा सहारा शोधला तर काहींनी फोनवरूनच अपडेट घेतले.

Web Title: Parbhani: After delays in declaration of results after counting of votes,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.