लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक हळदीसह इतर पिकांत येणाऱ्या हुमणी, मर यासारख्या कीडींसाठी रामबाण उपाय ठरले असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांच्या बायोमिक्सची विक्री झाली आहे.पिकांवर येणाºया कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी सर्वसाधारणपणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. हे कीटकनाशके वापरल्याने उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय रासायनिक द्रव्यांचा वारंवार वापर केल्याने जमिनीचा कस खालावतो.यावर मात करण्यासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने बायोमिक्स या जैविकांचे संशोधन केले असून, ते रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे बायोमिक्स परिणामकारक ठरत आहे. वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी मागील दोन वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग करुन बायोमिक्सची निर्मिती केली आहे. यापूर्वीही विद्यापीठात बायोमिक्स तयार केले जात होते, मात्र यावर्षीच्या बायोमिक्सला शेतकºयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हळद या पिकाबरोबरच टरबूज, पपई, डाळिंब या पिकांवर येणाºया रोगांचे नियंत्रण करण्यासाठी बायोमिक्स परिणामकारक ठरले आहे. त्यामुळे बायोमिक्सला शेतकºयांचा चांगला फिडबॅक मिळत आहे.दीडशे रुपयांना एक किलो या प्रमाणे बायोमिक्सची विद्यापीठातून विक्री केली जात आहे. एप्रिल महिन्यापासून शेतकºयांसाठी हे बायोमिक्स शेतकºयांसाठी उपलब्ध करुन दिले असून, दररोज सुमारे तीन टन बायोमिक्सची विक्री होते. सहा महिन्यांमध्ये १ कोटी ३४ लाख रुपयांचे बायोमिक्स विक्री झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट यांनी दिली.चौदा घटकांपासून बायोमिक्सची निर्मिती४बायोमिक्स निर्मितीची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. वनस्पती रोगशास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि या विभागात पीएच.डी. करणाºया विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पिकांसाठी आवश्यक असलेल्या जिवाणूंचा आणि बुरशीचा शोध घेऊन त्याच्या मिश्रणातून हे बायोमिक्स तयार करण्यात आले.४पिकांना अन्नपुरवठा वाढविणारे जमिनीतील ६, पानांतील एक अशा ७ प्रकारचे जिवाणू आणि सात प्रकारच्या बुरशींचा यासाठी वापर करण्यात आला. या जिवाणूंची विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ठराविक मात्रांपर्यंत वाढ केली जाते आणि त्यानंतर जिवाणू आणि बुरशींचे मिश्रण करुन हे बायोमिक्सची निर्मिती करण्यात आली आहे.कोणत्या पिकांसाठी, कोणत्या रोगावर फायदेशीर...हळद पिकातील हुमणी, मर या रोगांबरोबरच टरबूज,पपई, डाळिंब या पिकांवर येणाºया रोगांचे नियंत्रण करण्यासाठी हे बायोमिक्स परिणामकारक ठरले आहे. याशिवाय खरीप, रबी हंगामातील इतर पिकांसाठी देखील बायोमिक्सचा वापर केला जात आहे.कोणते फायदे झाले?चार किलो बायोमिक्स प्रति एकरी १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करुन द्यावे तसेच १०० ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकांची वाढ चांगली होते. शिवाय रोगांचा बंदोबस्त होतो. हळद पिकात कीडींचा बंदोबस्त तर झालाच, शिवाय हळदीचा पिवळेपणा १ टक्क्याने वाढल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट यांनी दिली. बायोमिक्सच्या वापराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने राज्यासह गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा इ. भागांतून शेतकरी विद्यापीठाचे बायोमिक्स खरेदी करीत असल्याचेही आपेट यांनी सांगितले.
परभणी : विद्यापीठाने संशोधित केलेल्या बायोमिक्सची विक्री कोटींच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 11:43 PM