परभणी: भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:40 AM2019-08-17T00:40:43+5:302019-08-17T00:40:50+5:30
जिंतूर तालुक्यातील हंडी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील हंडी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात आ.विजय भांबळे यांच्याकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी हंडी येथील भाजपाचे कार्यकर्ते भगवान पालवे, विठ्ठल पालवे, विष्णू डोईफोडे, गणेश डोईफोडे, अशोक कांगणे, राजेश घुगे, गणेश मुंडे, भगवान घुगे, भगवान कांगणे, राजू नागरे, गजानन डोईफोडे, अमोल राठोड, बाळू डोईफोडे आदींनी आ.भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना हंडी येथे कुठलीही विकासकामे होत नाहीत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून कच्च्या रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. तसेच सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरुन पाणी वाहते. शिवाय गावात पथदिवेही नाहीत. या बाबीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आ.भांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी पिंटू घुगे, पंढरी घुगे, रामप्रसाद घुगे, सोपान डोईफोडे, पांडुरंग डोईफोडे, सोपान कांगणे आदींची उपस्थिती होती.