लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जास्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाºया पूर्णा पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक लिपिकास २० जानेवारी रोजी सायंकाळी ४.१० च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.पूर्णा पंचायत समितीमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाºयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. जास्तीच्या कामाचे बिल तयार करुन ते मंजूर करण्यासाठी पूर्णा पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक लिपिक राजेंद्र मुंजाजीराव कनकुटे (५०) हे लाच मागत असल्याची त्यांची तक्रार होती. या तक्रारीवरुन २० जानेवारी रोजी पूर्णा पंचायत समितीमध्ये सापळा लावण्यात आला. तेव्हा वरिष्ठ सहायक लिपिक राजेंद्र कनकुटे यांनी तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारुन दुचाकीवरुन ते निघून गेले. ए.सी.बी.च्या पथकाने त्यांचा पाठलाग करुन पूर्णा- नांदेड रस्त्यावर एकबालनगर पाटीजवळ सायंकाळी ४.१० वाजेच्या सुमारास कनकुटे यांना पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कमही हस्तगत केली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
परभणीत दीड हजारांची लाच घेणाºया सहायक लिपिकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:29 AM