परभणी : प्रखर उन्हात कार्यकर्त्यांनी केला विजयाचा आनंदोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:51 AM2019-05-24T00:51:44+5:302019-05-24T00:51:54+5:30
हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून सुुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची विद्यापीठ परिसरात गर्दी दिसून येत होती. कार्यकर्ते दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन भर उन्हात निकाली वाट पाहत होते. रस्त्यावर वाहनांची वर्दळही दिसून येत होती.
सुुरुवातीच्या फेऱ्यांचे निकाल जाहीर होताच शिवसेनेला आघाडी मिळत गेल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यात उत्साह दिसून येत आहे. सकाळी १० वाजेच्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत जात असल्याने कार्यकर्ते मोकळ्या मैदानावरील झाडाखाली उभे राहून एक एक मत फेरीचे वाट पाहत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास मात्र परिसरातील गर्दी कमी झाल्याचे दिसून येत होेते. मतफेºयांची मोजणी वाढत असताना शिवसेना कार्यकर्त्यांचा जोष वाढत होता. १७ व्या फेरीपर्यंतही शिवसेनेला मताधिक्य वाढतच गेल्याने राष्टÑवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते मात्र या भागातून काढता पाय घेत असल्याचे व अस्वस्त असल्याचे दिसून येत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळून विजयी झाल्याची बातमी कार्यकर्त्यांपर्यत पोहचल्यानंतर विद्यापीठमधील रेल्वेगेटच्या परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच खा. बंडू जाधव हे मतमोजणी केंद्रा परिसरात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साहात शिगेला पोहचला.
कार्यकर्त्यांनी खा. जाधव यांना गराडा घालत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भगवे रुमाल घालून गुलालाची उधळण करीत असल्याचे चित्र विद्यापीठ परिसरात दिसून आले.