परभणी : कागदोपत्रीच केले चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:43 AM2019-02-25T00:43:10+5:302019-02-25T00:43:35+5:30

जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण्याची भिती निर्माण झाली आहे.

Parbhani: Documented fodder is planned | परभणी : कागदोपत्रीच केले चाऱ्याचे नियोजन

परभणी : कागदोपत्रीच केले चाऱ्याचे नियोजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण्याची भिती निर्माण झाली आहे.
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्यात पाण्याच्या टंचाई बरोबरच चारा टंचाईचाही सामना करावा लागत आहे. यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामात पेरणी झाली नाही. त्यामुळे चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागात ओला चाराही शिल्लक नाही. परिणामी जनावरांना चारा उपलब्ध करुन देताना पशूपालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती सध्या निर्माण झाली असून जिल्हा प्रशासन मात्र आकडेवारीवरुन चारा मूबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने सांगत आहे. जिल्हा पशूसंवर्धन विभागाने २० जूनपर्यंतच्या चाºयाचे नियोजन केले आहे. या नियोजनात खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८०० मेट्रीक टन, रब्बी हंगामातून ७४ हजार ५०० मे. टन, जंगल, वन क्षेत्र व पडीक जमिनीवर ३० हजार मे. टन, वैरण पिकापासून ४० हजार ३०० मे. टन आणि वैरण विकास योजनेतून उपलब्ध होणारा चारा असा ५ लाख ९० हजार ८०० मे. टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
चाºयाची ही उपलब्धता दर्शविताना प्रत्यक्षात पशू संवर्धन विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. खरीप हंगामात चारा पिकासाठी पाण्याची सुविधा केली नाही. रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेला असताना या हंगामात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी ठोस उपाययोजना न करताच केवळ चाºयाचा अंदाज बांधून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन पूर्णत: शेतकºयांच्याच भरोस्यावर असल्याचे दिसत आहे.
प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती बिकट झाली आहे. जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने शेतकºयांना महागामोलाचा चारा विकत घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु केली नसल्याने हजारो जनावरे पशूपालकांच्या प्रयत्नांवरच जगत आहेत. जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
एकमेव चारा शिबीर
परभणी जिल्ह्यामध्ये थेट राज्य शासनामार्फत राणीसावरगाव येथे एकमेव चारा शिबीर सुरु आहे. या चारा शिबिरात ४०५ जनावरांच्या चाºयाची व्यवस्था केली आहे; परंतु, प्रत्यक्षात जनावरांची संख्या लाखात असताना उपाययोजना मात्र मोजक्याच जनावरांसाठी केली जात आहे. जिंतूर तालुक्यात आडगाव व चारठाणा मंडळात चारा छावणी सुरु करावी लागणार असल्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. अद्यापपर्यंत एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु केली नाही, हे विशेष.

Web Title: Parbhani: Documented fodder is planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.