लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: परभणीतील जनतेने गेल्या २५ ते ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून दिल्याने जिल्हा विकासापासून वंचित राहिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.शहरातील राष्ट्रवादी भवन येथे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आ.दुर्राणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.विजय भांबळे, आ.रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, मारोती बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, महिला जिल्हाध्यक्षा नंदा राठोड, नानासाहेब राऊत, भगवान राठोड, जि.प.सदस्य मीना राऊत, संध्या मुरकुटे, अरुणा काळे, प्रसाद बुधवंत, ममता मते, इंदुबाई घुगे, दगडूबाई तिथे, कुंडलिक सोगे, चक्रधर उगले, मनोज राऊत आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ.दुर्राणी म्हणाले की, गेल्या २५ -३० वर्षापासून जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार निवडून दिला. त्यामुळे जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. सत्तेत राहुन फायदा मिळवायचा आणि रस्त्यावर उतरून विरोधाचे नाटक करायचे, अशी शिवसेनेची दुटप्पी भुमिका सुरु आहे, असाही आरोप यावेळी दुर्राणी यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीला संधी द्या, विकासाची हमी मी देतो, असे ते म्हणाले.यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. आयोजक सोनटक्के यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खऱ्या अर्थाने ओबीसी समाज बांधवांसाठी मोठे कार्य केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव शिंदे यांनी तर आभार दत्तात्रय मायंदळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृष्णा कटारे, अभय कच्छवे, शाम देवकते, लालसिंग पवार, सुरेश लटपटे, तुकाराम गोंगे, ज्ञानोबा घोरपडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
परभणी : शिवसेनेमुळेच जिल्हा विकासापासून वंचित-दुर्राणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:22 AM