लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांची कोंडी झाली आहे. २० दिवसांत मार्केट यार्डात १२५ क्विंटलची खरेदी खाजगी व्यापाºयांकडून करण्यात आली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील खाजगी व्यापाºयांनी १ ते २० जानेवारी या काळात १२५ क्विंटल तुरीची खरेदी शेतकºयांकडून केली. केंद्र शासनाने तुरीला ५ हजार ४५० रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे. सर्वसाधारणपणे शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसारच शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे.परंतु, अनेक वेळा व्यापारी हमीभावाने खरेदी करीत नाहीत. परिणामी शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर्षीच्या हंगामात तुरीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे निश्चित तुरीला भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, त्याला फाटा देत व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे सुरु आहे. परभणी येथील बाजार समितीमध्ये कमीत कमी ३९०० रुपयांपासून तुरीची खरेदी करण्यात आली.मोजक्या काही शेतकºयांना ४ हजार २३८ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. २० दिवसांत कृउबाच्या कार्यक्षेत्रातील तूर उत्पादकांनी १२५ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. मात्र हमीभाव जाहीर झाला असतानाही शेतमालाची विक्री कवडीमोल दराने करावी लागल्याने तूर उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांनी कापूस, मूग, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली होती. परंतु, जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग ही पिके शेतकºयांच्या हातची गेली असली तरी तुरीने मात्र शेतकºयांना तारले आहे.मात्र, शेतकºयांच्या शेतमालाला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ जिल्ह्यामध्ये तूर खरेदी करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र उघडावेत, अशी मागणी तूर उत्पादकांमधून होत आहे.मूग, सोयाबीन, तूरीला : हमीभाव मिळेनायावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. त्याच बरोबरीला मूग, उडीद ही पिकेही घेतली. परंतु, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकºयांच्या हातची पिके गेली.ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते, त्यांना चांगले उत्पादन झाले. परंतु, बाजारपेठेत या शेतमालाला शासनाचा हमीभाव मिळालाच नाही.त्यातच सध्या बाजारपेठेत नवीन तूर विक्रीस शेतकरी आणत आहेत. परंतु, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ४५० रुपये या हमीभावास फाटा देत व्यापारी कवडीमोल दराने तुरीची खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोयाबीन, मुगापाठोपाठ तुरीलाही बाजारपेठेत हमीभाव मिळेनासा झाला आहे.सोयाबीन पोहचले ३ हजार ३०० रुपयांवरजिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांजवळ जोपर्यंत सोयाबीन विक्रीस होते, तोपर्यंत सोयाबीनला भाव मिळालाच नाही. बाजारपेठेतील व्यापाºयांनीही शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये या हमीभावाला फाटा देत २५०० ते २७०० रुपयापर्यंतची सोयाबीनची खरेदी केली. परंतु, सध्या सोयाबीनचा भाव चांगलाच वधारला आहे. सोयाबीनचा सध्या ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या भावाचा शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
परभणी : कवडीमोल दराने शेतकºयांची तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:20 AM