लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषणाला सुरुवात केली आहे.शिर्शी खु. ते सहजपूर जवळा असा गाडी रस्ता असून काही वर्षापासून हा रस्ता बंद करण्यात आल्याने आंदोलनाचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. येथील शेतकºयांनी पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन दिले आहे. हा रस्ता पिढ्यान्पिढ्या वहिवाटीचा रस्ता होता. मात्र गट क्रमांक १०८, १२१ व १२२ मधील शेतकºयांनी दीड वर्षापासून रस्ता अडविला आहे. या संदर्भात तहसील कार्यालय तसेच पोलीस अधीक्षकांकडेही तक्रारी केल्या. मात्र दखल घेतली नसल्याने १६ जुलैपासून उपोषण करीत असल्याचे म्हटले आहे. सोमवारी सकाळी पाऊस सुरु असतानाही हे शेतकरी गुराढोरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दाखल झाले. भर पावसात शेतकºयांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
परभणी : शेत रस्त्यासाठी गुराढोरांसह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:06 AM