परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:51 PM2019-08-21T23:51:00+5:302019-08-21T23:51:15+5:30
विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून विनाअनुदानीत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून विनाअनुदानीत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे़
जिल्ह्यातील विनाअनुदानीत शाळांना अनुदान नसल्याने या शाळेतील शिक्षक १० ते १५ वर्षांपासून विना वेतन काम करीत आहेत़ वारंवार मागणी करूनही या शिक्षकांना वेतन दिले जात नसल्याने कुटूंबियांवर आर्थिक संकट ओढावले आहे़ जिल्ह्यात काही शाळा अंशत: अनुदानीत आहेत़ या शाळांनाही प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, अशी मागणी करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २१ आॅगस्टपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे़ त्याचबरोबर विनाअनुदानीत शाळा बंद ठेवण्याचे आंदोलनही सुरू करण्यात आले आहे़ मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली़ संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सवंडकर, किशन सरवर, राम ढोणे पाटील, आऱएम़ लाटवाडे, पोके, टेकाळे यांच्यासह शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत़