परभणी : क्रीडा संकुल जागेची अखेर मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:58 AM2018-12-16T00:58:02+5:302018-12-16T00:58:40+5:30
तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेची भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली आहे. दोन कार्यालयांच्या सन्मवयाअभावी रखडलेली जमीन मोजणी झाल्यामुळे क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेची भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली आहे. दोन कार्यालयांच्या सन्मवयाअभावी रखडलेली जमीन मोजणी झाल्यामुळे क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण व सुविधा मिळाव्यात, यासाठी २००९-१० साली तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
नूतन महाविद्यालयासमोरील जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेवर बास्केट बॉलचे मैदान तयार करण्यात आले होते; परंतु, जागेचा वाद न्यायप्रविष्ट झाल्याने क्रीडा संकूल उभारणी रखडली होती. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून जागेचा शोध घेण्यात येत होता; परंतु, आवश्यक तेवढी लागणारी जागा उपलब्ध होत नव्हती. मात्र नगरपालिकेने जुन्या स्टेडियम भागातील जागा संपूर्ण प्रक्रिया करून क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभागाला उपलब्ध करून दिली होती. जागा मोजणीसाठी लागणाऱ्या शुल्कावरून क्रीडा विभाग व भूमिअभिलेख कार्र्यालयात अनेक दिवस पत्र प्रपंच सुरू होता.
दोन्ही कार्यालये आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे चार ते पाच महिन्यांचा कालावधी जागा मोजणीसाठी लागला. वरिष्ठ अधिकाºयांनी यात हस्तक्षेप करून भूमिअभिलेख कार्यालयास जागा मोजण्याची सूचना केली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी जुन्या स्टेडीयम परिसराची जागा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाºयांनी मोजणी करून दिली आहे. प्राप्त माहितीनुसार जागेचा नकाशा पूर्ण झाल्यानंतर क्रीडा संकुल उभारणीला गती मिळणार आहे.