लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुरुवारी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनांतर्गत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ तसेच प्लास्टिक बुलेटचे फायर केल्याने एक आंदोलक जखमी झाला आहे़ तत्पूर्वी दिवसभराच्या आंदोलनात १३ पोलीस कर्मचारी, तीन आंदोलक आणि एक चालक असे १७ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली़मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आठवडाभरापासून आंदोलन सुरू आहे़ दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र स्वरुपाचे होत आहे़ गुरुवारी मराठा समाज बांधवांच्या वतीने परभणीत ठिय्या आंदोलन पुकारले होते़ या दिवशी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले़परभणी-जिंतूर महामार्गावर टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, विसावा फाटा आदी ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ टाकळी कुंभकर्ण येथे मोठा जमाव जमला होता़ जमावाला पांगविण्यासाठी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी हवेत गोळीबार केला़ त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने दुपारी १़३० वाजेच्या सुमारास पुन्हा हवेत गोळीबार करण्यात आला़ त्यानंतरही जमाव पांगत नसल्याने अश्रूधुराचा मारा करण्यात आला़ यात दोन आंदोलक जखमी झाले़ त्यानंतर पोलिसांनी प्लास्टिक बुलेटच्या सहाय्याने फायर केले़ यामध्ये लखन बाळासाहेब विरकर हा आंदोलक जखमी झाला आहे़ सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत टाकळी कुंभकर्ण येथील आंदोलनाची तीव्रता कायम होती़ परभणीतील विसावा कॉर्नर, वसमत रोड, धर्मापुरी, नांदापूर, झरी येथेही आंदोलकांनी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले़ टाकळी येथील आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने दुपारी पोलीस अधीक्षक दिलीप झळके, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी भेट दिली़ त्यानंतर काही वेळाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनीही भेट दिली़ सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलनाची झळ कायम होती़ या आंदोलना दरम्यान, मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता़ दरम्यान, शनिवारी बंदचे आवाहन करण्यात आले नव्हते़ परंतु, शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती़मोहन फड यांच्या पेट्रोल पंपावर दगडफेकवसमत रस्त्यावरील आ. मोहन फड यांच्या पेट्रोलपंपावर आंदोलकांनी दुपारी दगडफेक केली़ या ठिकाणच्या वाहनांवर आणि पेट्रोल पंपाच्या कार्यालयावरही दगडफेक झाली आहे़ तर सायंकाळच्या सुमारास याच रस्त्यावर असलेल्या आऱआऱ पेट्रोल पंपावरही दगडफेक करून नुकसान करण्यात आले़वसमत रस्त्यावर : ठिकठिकाणी आंदोलनपरभणी शहरातून जाणाऱ्या वसमत रस्त्यावर शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले़ आऱ आऱ पेट्रोल पंप, शिवशक्ती बिल्डींग, काळी कमान, खानापूर फाटा, जुने आरटीओ कार्यालय इ. ठिकाणी टायर जाळून चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ शहरातील आऱ आऱ पेट्रोल पंप, शिवशक्ती बिल्डींग या ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या़ दिवसभर रस्त्यावर टायर जाळण्यात आले़ हा संपूर्ण रस्ता दिवसभर आंदोलनामुळे वाहतुकीसाठी ठप्प होता़ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ सायंकाळी देखील या रस्त्यावर युवक गटागटाने फिरत होते़ दगडफेकीमुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडांचा खच पडल्याचे दिसून आले़मारहाण व दगडफेकीत १३ पोलीस जखमीटाकळी कुंभकर्ण येथे तुफान दगडफेक व पोलीस कर्मचाºयांनाच मारहाण झाल्याने १३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत़ त्यामध्ये पोनि नरेंद्र पाडळकर, फौजदार उदय सावंत, योगेश सानप, जनादन चाटे, सुरेश सुरनर, जे़जे़ कदम, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर निलंबाळकर, साईनाथ मिठेवाड आदी पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे़ या सर्व पोलीस कर्मचाºयांवर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ धर्मापुरी येथील रस्ता मोकळा करून टाकळी कुंभकर्णकडे जाणाºया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांची टाकळी कुंभकर्ण शिवारात जीप अडवून त्यांना जीपमधून खाली उतरवून लाठी-काठीने मारहाण करण्यात आली़ तशी माहिती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पाडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़
परभणी :गोळीबार, दगडफेकीने चिघळले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:04 AM