परभणी : कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी पुढील आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:10 AM2020-02-06T01:10:49+5:302020-02-06T01:11:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात ...

Parbhani: First list of debt relief scheme next week | परभणी : कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी पुढील आठवड्यात

परभणी : कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी पुढील आठवड्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या १५ फेब्रुवारी रोजी लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या प्रत्यक्ष लाभासाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, राज्यभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली़ या योजनेंतर्गत शेतकºयांकडील अल्प मुदतीचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला़
या निर्णयानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले़ हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, या योजनेंतर्गतची पहिली अधिकृत यादी १५ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार आहे़ जाहीर केलेली ही यादी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यावरून शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली़, कोणत्या खात्यातील कर्जमाफ झाले, याची माहिती उपलब्ध होणार आहे़
ही कर्जमुक्ती योजना ३ टप्प्यात राबविली जाणार आहे़ त्यातला पहिला टप्पा हा १ ते १५ फेब्रुवारी असा असून, या काळात पहिली यादी जाहीर करून ती आधार प्रमाणीकरण केली जाणार आहे़ त्यानंतर प्रत्यक्षात शेतकºयांच्या खात्यातील कर्जाची रक्कम माफ होणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना आता कर्जमुक्तीच्या प्रत्यक्ष लाभासाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
अशी आहे कर्जमुक्तीची प्रक्रिया
४१५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिली यादी जाहीर झाल्यानंतर यादीतील खातेदारांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे़ पात्र शेतकºयांना आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्यांच्या नावासमोर थम्ब इम्पे्रशनद्वारे अथवा मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपीवरून किती रुपयांची कर्जमाफी झाली, याची माहिती मिळणार आहे़ थम्ब केल्यानंतर त्या शेतकºयाचे नाव, आधार क्रमांक, माफीची रक्कम, युनिट आयडी, बँक खाते क्रमांक आदी माहिती स्क्रीनवर दिसणार असून, ही माहिती तपासल्यानंतर शेतकºयाने ‘सहमत’ हा पर्याय निवडल्यानंतरच त्या शेतकºयास कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे़ कर्जाची रक्कम किंवा इतर माहितीत तफावत असल्यास शेतकरी ‘असहमत’ हा पर्याय निवडू शकतात़ त्यानंतर संबंधित खात्याची जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांमार्फत तपासणी केली जाणार आहे़
२ लाख ४१ हजार शेतकरी पात्र
४४ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २ लाख ४१ हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत़ या शेतकºयांकडील १२२४ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे़ अजूनही शेतकºयांचा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत पात्र शेतकरी आणि कर्जमुक्तीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
१३ हजार शेतकºयांचे आधार लिंक मिळेनात
या योजनेत ज्या शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याला लिंक आहेत, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे़ सद्यस्थितीला जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५ हजार १७८, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेतील ८ हजार १०४ आणि मराठवाडा ग्रामीण बँकेतील ३२१ खातेदारांचे आधार क्रमांक खात्याशी लिंक नाहीत़ त्यामुळे या शेतकºयांनी बँक प्रशासन अथवा विविध कार्यकारी सोसयाटीच्या गटसचिवांशी संपर्क साधून आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले

Web Title: Parbhani: First list of debt relief scheme next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.