लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संजिवनी मित्र मंडळाच्या वतीने ७ ते ११ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात राज्यभरातून १७० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलमधून तीन कोटींची उलाढाल झाली आहे. यामुळे या कृषी महोत्सवाला पाचही दिवस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.परभणी येथील वसमतरोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान कृषी संजीवनी महोत्सव तसेच प्रदर्शन भरविण्यात आले आले होते. यात जवळपास १७० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणे, जिल्हा परिषद, कृषी विभाग, बाजार समिती, कृषी विद्यापीठाच्या स्टॉल्सबरोबर बी-बियाणे, किटकनाशक, रोपवाटिका, ट्रॅक्टर, मशागतीचे यंत्र, ठिबक सिंचन, गृहोपयोगी वस्तू व महिला बचत गटांनी स्टॉलची उभारणी केली होती. या कृषी महोत्सवात सांगली, सातारा, नांदेड, औरंगाबाद, बीड, लातूर, कोल्हापूर,जालना, हिंगोली तसेच इतर ठिकाणावरुन शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. या महोत्सवात महिला बचत गटांसाठी गृहोपयोगी वस्तुंचे स्टॉल उभारण्यात आले होते.महिला बचत गटाच्या स्टॉलकडे नागरिकांचा जास्त कल दिसून आला. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, जि. प. कृषी विभाग, व्हेटनरी कॉलेज, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आलेल्या नागरिकांना विविध विषयांची माहिती देण्यात आली. या कृषी महोत्सवाचे नियोजन व आयोजन भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.प्रदर्शन काळाची गरज४अशा प्रदर्शनातून नवनवीन माहिती शेतकºयांना मिळते. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्यांसह इतर वस्तूही या कृषी महोत्सवात पहायास मिळाल्या. अनेकांनी या प्रदर्शनातून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. नवनवीन तंत्रज्ञानाकडे तरुण शेतकºयांचा कल दिसून आला.
परभणी : पाच दिवसांत कृषी महोत्सवात तीन कोटी रुपयांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:40 AM