लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासूनचे पगार रखडल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत़ दसरा हा सण जवळ आला असून, या पार्श्वभूमीवर थकलेले पगार करावेत, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिकेला सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़ चार महिन्यांपासून पगार नसल्याने कामगार आर्थिक कचाट्यात सापडले आहेत़ वैद्यकीय व शैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत़ रोजंदारी कर्मचाºयांचा पगाराचा प्रश्न तसेच त्यांना शासन सेवेत कायम करण्याचा प्रश्नही सुटलेला नाही़ सेवानिवृत्त कर्मचाºयांचे वेतनही थकले असून, पगार नसल्याने बँकांचे हप्ते, एलआयसी हप्ते खोळंबून व्याजाचा भुर्दंड कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे़ ही बाब लक्षात घेता कर्मचाºयांचे थकीत वेतन अदा करावे, दसरा सणासाठी १० हजार रुपये फेस्टीव्हल अडव्हान्स द्यावा, सफाई कामगारांना पूर्वीप्रमाणेच एक वेळ काम द्यावे, रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ संघटनेचे अध्यक्ष अनुसयाबाई जोगदंड, उपाध्यक्ष कदम, सचिव भारसाखळे आदींची निवेदनावर नावे आहेत़
परभणी : मनपाकामगारांचे चार महिन्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:30 AM