परभणी : कृषी विद्यापीठाला २३ कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:42 AM2019-08-17T00:42:05+5:302019-08-17T00:43:51+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी देण्यात आले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी देण्यात आले आहेत़
राज्य शासनाने २००० ते २००१ या आर्थिक वर्षापासून कृषी विद्यापीठाला अनुदान मंजूर करण्यासाठी सुधारित सहाय्यक अनुदान सूत्र निश्चित केले आहे़ त्यानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता ‘२४५१’ कृषी विषयक संशोधन व शिक्षण या मुख्य लेखाशीर्षाखाली पीक संवर्धन सहाय्यक अनुदान भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान आदींसाठीची तरतूद केली आहे़ त्यानुसार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता १७० कोटी ९४ लाख ४० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ त्यापैकी आतापर्यंत ४३ कोटी ४८ लाख १ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, आता ९ आॅगस्ट रोजी नव्याने आदेश काढून २३ कोटी ५४ लाख ८ हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़ त्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी तरतूद करण्यात आलेल्या १४ कोटी ६७ लाख रुपयांपैकी ४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़
४या शिवाय वेतनेत्तर अनुदान, भांडवलीमत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान, वेतन सहाय्यक अनुदान आदी अंतर्गत २ कोटी ९३ लाख ३६ हजार रुपये वितरित करण्यात आले आहे़त.तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद अर्थसहाय्यीत योजनेंतर्गत १ कोटी २० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत़
४या निधीमुळे कृषी विद्यापीठातील विकास कामांना चालणार मिळणार आहे़ तसेच वेतन व वेतनेत्तर अनुदानाचा प्रश्न सुटणार आहे़