वीस लाखांचा निधीलोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध विकास योजनेतून पाथरी मतदार संघातील वाघाळा येथे हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली.वाघाळा येथे नुकतेच इंद्राणी मित्रमंडळ व भाजपाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आ. मोहन फड यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी इंद्राणी मित्रमंडळाचे अध्यक्ष माधव घुंबरे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष हनुमान घुंबरे यांची उपस्थिती होती. आ. फड म्हणाले, पाथरी विधानसभा मतदार संघातील रस्ते आणि गावातील मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी घेण्यात आला आहे. अनेक गावात रस्ते, नाली व सार्वजनिक सभागृहाची कामे झाली आहेत. शाळेच्या ई-लर्निंगसाठी स्थानिक निधीतून कामे करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. वाघाळा येथे सभागृहासाठी २० लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल आ. फड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सदाशिव घुंंबरे, उपसरपंच दत्तराव घुंबरे, धनंजय महाराज, विठ्ठल महाराज, रणजित घुंबरे, अतूल घुंबरे, शरद घुंबरे, जयराज घुंबरे आदींची उपस्थिती होती. हनुमान घुंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी पाथरी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
परभणी : सभागृह बांधकामास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:30 PM