परभणी : टँकरने ओलांडला पाऊणशेचा आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:46 PM2019-05-26T23:46:20+5:302019-05-26T23:46:41+5:30
जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़
संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना सतावते़ परभणी जिल्ह्यातही सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होते़ मात्र टंचाईची ही तीव्रता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते़ यावर्षी परभणी जिल्ह्याने हा अपवाद मोडित काढला असून, जिल्ह्यातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ गोदावरी, पूर्णा, वाण, बोरणा, करपरा, दूधना या नद्यांच्या पात्रात केवळ कोरडी वाळू शिल्लक आहे़ भकास पडलेले हे पात्र आणि प्रमुख प्रकल्प गावतलावांनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली असून, यंदा प्रथमच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करावेत लागत आहेत़
शहरासह ग्रामीण भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, टँकर आल्यानंतर ग्रामस्थांचा टँकरभोवती गराडा पडतो़ एक-दोन बॅलर पाणी टँकरच्या सहाय्याने उपलब्ध होत असून, हे पाणी चार ते पाच दिवस पुरविले जात आहे़ अनेक भागांत विकतच्या पाण्यावर ग्रामस्थांना दिवस काढावे लागत आहेत़ त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक गंभीर झाली आहे़
नळ पुरवठा योजनांची दुरुस्ती विहीर, बोअरचे अधिग्रहण यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाई शिथील करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत असले तरी दिवसेंदिवस टंचाई वाढत चालल्याने प्रशासनाचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गाव परिसरात पाणी शिल्लक नसल्याने शेतातून पाणी आणावे लागत आहे. वाढती पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
१०० टँकरचे नियोजन
च्जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यात सुमारे सहा महिन्यांच्या पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला होता़
च्या आराखड्यामध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १०० टँकर लागतील, असा अंदाज बांधला होता़ या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८५ टँकर सुरू करण्यात आले असून, लवकरच १०० टँकर सुरू करावे लागण्याची चिन्हे आहेत़
च्जून महिन्यांपासून पावसाळ्याचे वेध लागतात. मात्र पाऊस वेळेवर झाला नाही तर संपूर्ण जून महिन्यांत टंचाई निवारणाची कामे जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मंजुरी दिलेली कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.
पाथरी तालुका टँकरमुक्त
च्ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले असले तरी पाथरी तालुक्यात मात्र आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़
च्तालुक्याला यापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाले होते़ तसेच गोदावरी नदीपात्रावर बांधलेले दोन बंधारे या तालुक्यात असल्याने थोडेफार पाणी उपलब्ध होत आहे़
च्या पाण्याच्या भरोस्यावर तालुक्यात आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़
पालम तालुक्यात सर्वाधिक टँकर
च्आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू केले़
च्सद्यस्थितीला पालम तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत़ तालुक्यातील १६ गावे आणि सहा वाड्यांना या टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़
च्गंगाखेड तालुक्यातील सहा गावे आणि तीन वाड्यांना १३ टँकर, जिंतूर तालुक्यातील १३ गावांना १३ टँकर, पूर्णा तालुक्यातील १२ गावांना १४ टँकर, सेलू तालुक्यातील ९ गावांना १०, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, परभणी तालुक्यातील ३ गावांना एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़