लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, यावर्षी खरीप आणि रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १७८३ कोटी ९० लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे़ त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा प्रश्न निकाली निघाला आहे़जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेतला जातो़ सुमारे ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतात़ या पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने विविध बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वितरण केले जाते़ या कर्जाच्या भरोस्यावरच अनेक शेतकरी पेरण्याही करतात़ दरवर्षी खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील बँकांना खरीप आणि रबी या दोन्ही हंगामासाठीचे पीक कर्ज निश्चित करून दिले जाते़ सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पेरण्यांची लगबग सुरू होते़ पेरणी योग्य मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरच शेतकरी पेरण्यांना सुरूवात करतात़ मागील काही वर्षांपासून मान्सूनचा पाऊस लांबत असल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात प्रत्यक्ष पेरण्या सुरू होतात़ त्यामुळे जुलैपूर्वी शेतकºयांच्या हातात पैसा मिळणे आवश्यक आहे़ बियाणे, खते, किटकनाशकांची खरेदी करण्यासाठी पैशांची निकड भासते़ ही बाब लक्षात घेऊन बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले तर शेतकºयांचाही प्रश्न मिटू शकतो़ मात्र मागील काही वर्षांपासून पीक कर्ज वाटप प्रक्रिया रखडत आहे़ खरीप हंगाम ओसरल्यानंतरही अनेक शेतकºयांना मागणी करूनही कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ यावर्षी पुन्हा नव्याने कर्ज वाटपाला सुरुवात होणार आहे़ जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून, बँकांनीही वेळेत कर्ज वाटप करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़ जिल्ह्यातील वाणिज्य, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांना जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे़ येणाºया खरीप हंगामासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, रबी हंगामासाठी ३१३ कोटी ४६ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे़ बँकांनी नियोजनपूर्वक कामे करून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे़वाणिज्य बँकांना : सर्वाधिक उद्दिष्ट४जिल्ह्यातील वाणिज्य बँकांना सर्वाधिक १३११ कोटी ९४ लाख रुपयांचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे़ या बँकांनी खरीप हंगामात ११६४ कोटी ८३ लाख रुपये आणि रबी हंगामात २०७ कोटी ११ लाख रुपये पीक कर्ज वाटप करावयाचे आहे़४ग्रामीण बँकेला खरीप हंगामामध्ये २०० कोटी १४ लाख, रबी हंगामात ३१ कोटी ८२ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला खरीप हंगामात १६५ कोटी ४७ लाख आणि रबी हंगामात ७४ कोटी ५३ लाख असे २४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केल आहे़गतवर्षी रखडले होते उद्दिष्ट४मागील वर्षी परभणी जिल्ह्यात पावसाचा अनियमितपणा झाल्याने शेतकºयांना खरीप, रबी हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागले़ त्याचबरोबर पीक कर्जासाठी आंदोलनेही करावी लागली होती़४बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात होता़ विशेष म्हणजे मागील वर्षी कर्ज वाटपाचे उद्दिष्टही पूर्ण झाले नाही, हे विशेष़४यावर्षी बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, यासाठी जिल्हाधिकाºयांनी कडक भूमिका घ्यावी व जास्तीत जास्त शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे़
परभणी : १७८३ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:51 PM