परभणी : ३ हजार रुपयांची लाच घेताना पत्नीसह पोलीस पाटील ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:36 AM2020-02-12T00:36:54+5:302020-02-12T00:38:08+5:30

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले.

Parbhani: Police Patil with wife taking bribe of Rs | परभणी : ३ हजार रुपयांची लाच घेताना पत्नीसह पोलीस पाटील ताब्यात

परभणी : ३ हजार रुपयांची लाच घेताना पत्नीसह पोलीस पाटील ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी- मानवत तालुक्यातील पोहंडूळ येथील एका शेतकऱ्याला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पोलीस पाटील लक्ष्मण उत्तमराव कोप्रटकर यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार परभणी येथील कार्यालयात सदरील शेतकºयाने केली होती. त्यानंतर या कार्यालयाच्या वतीने तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोहंडूळ येथे सापळा लावण्यात आला. यावेळी तक्रारकर्त्याकडून ३ हजार रुपयांची लाच पोलीस पाटील लक्ष्मण कोप्रटकर हे त्यांच्या पत्नी शारदा लक्ष्मण कोप्रटकर यांच्यामार्फत घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. ही कावाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक भारत हुंबे, पोनि.भूजंग गोडबोले, अमोल कडू, हनुमंत कटारे, मुक्तार शेख, सचिन धबडगे, चौधरी यांच्या पथकाने केली.
करम येथे विद्यार्थिनीची आत्महत्या
४सोनपेठ- तालुक्यातील करम येथे एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. परळी तालुक्यातील इंदपवाडी येथील पल्लवी जंगले (१८) ही विद्यार्थिनी आई व भावासह करम येथे राहत होती. ती सोनपेठ येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पल्लवी माणिक जंगले हिने घरातील लोखंडाच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत दशरथ मोरे यांनी दिलेल्या माहितीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
४गंगाखेड- परळी रोडवरील वैतागवाडी पाटी जवळ दुचाकी चालकास धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरुद्ध गंगाखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन गावाकडे परतणाºया दाम्पत्याच्या एम.एच.२२- एक्यू ७५२३ क्रमांकाच्या दुचाकीला १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात पीकअप चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली होती.
४या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई सार्थक बचाटे (२०) यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती सार्थक संजय बचाटे हे जखमी झाले होते. याबाबत मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सार्थक बचाटे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात पीकअप चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी राजेश राठोड करीत आहेत.

Web Title: Parbhani: Police Patil with wife taking bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.