लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :मानवत रोड ते परळी या ६७ किमी रेल्वे मार्गाच्या मंजुरीचा ९२२ कोटींचा प्रस्ताव नांदेड व सिकंदराबाद येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अंतीम मंजुरीसाठी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याची माहिती आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी दिली़देशभरातून येणाºया भक्तांना साईबाबांचे जन्मस्थळ व परळी वैजनाथ येथील ज्योतिलर््िांगाचे दर्शन घेणे सोयीचे व्हावे, यासाठी मानवत रोड-पाथरी-सोनपेठ-परळी या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात यावी, यासाठी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी पुढाकार घेतला आहे़ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही साई जन्मस्थळाचा विकास करण्याचे आश्वासन बिहारचे राज्यपाल असताना पाथरी येथे दिले होते़ या प्रश्नी विधान परिषदेतही आ़ दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती़ या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्गाच्या मंजुरी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे़ ६७ किमीच्या या रेल्वे मार्गासाठी ९२२ कोटी रुपये लागणार असून, या संदर्भातील प्रस्ताव नांदेड व सिकंदराबाद येथील रेल्वेच्या अधिकाºयांनी तयार केला आहे व तो मंजुरीसाठी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी दिली़ या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर मानवत रोड ते परळी दरम्यानच्या मार्गावरील भूसंपादनासाठी राज्य शासनाला तत्परतेने कारवाई करावी लागणार आहे़ हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आ़ दुर्राणी यांनी सांगितले़
परभणी : मानवत रोड-परळी रेल्वे मार्गासाठी ९२२ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:12 AM