परभणी :‘रमाई आवास’चे प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:10 AM2018-01-22T00:10:51+5:302018-01-22T00:10:58+5:30
रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातच पडून असल्याने आर्थिक वर्ष संपत आले तरीही तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण होईना़ त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतिक्षा शिगेला टांगली आहे.
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातच पडून असल्याने आर्थिक वर्ष संपत आले तरीही तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण होईना़ त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतिक्षा शिगेला टांगली आहे.
ग्रामीण भागातील मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना त्यांचे हक्काचे घरकूल मिळावे, या उद्देशाने राज्य शासन रमाई आवास योजना राबविते़ या योजनेंतर्गत प्रत्येक पंचायत समितींना घरकुलांचे उद्दिष्ट दिले जाते़ त्यानुसार पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांकडून प्रस्तावांची मागणी करण्यात येते़ २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ११०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ पंचायत समितीमार्फत यासाठी लाभार्थ्यांकडून प्रस्तावांची मागणी करण्यात आली़
लाभार्थ्यांनीही योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले आहेत़ तब्बल १६०० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत़ मात्र अद्यापपर्यंत या प्रस्तावांवर साधी चर्चाही झाली नाही़ त्यामुळे लाभार्थ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव पंचायत समितीतच धूळ खात पडून आहेत़
दरवर्षी रमाई आवास योजनेंतर्गत पंचायत समित्यांना उद्दिष्ट दिले जाते़ पंचायत समित्यांमार्फत आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून टप्प्या टप्प्याने घरकुलांचे अनुदानही वितरित केले जाते़ मात्र यावर्षी पंचायत समितीचा कारभार ढेपाळला आहे़
जानेवारी महिना उजाडला तरीही लाभार्थ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव पंचायत समितीमधून पुढे सरकारले नाहीत़ आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़
या दोन महिन्यांत पंचायत समितीचे अधिकारी प्रस्ताव मंजूर करून मोकळे होतीलही़ परंतु, लाभार्थ्यांना अनुदान कधी मिळणार? आणि त्यांनी घरकुले कधी बांधायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ घरकुलांचे प्रस्ताव पुढे पाठविण्यास चालढकल होत असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ पं़स़च्या अधिकाºयांनी रमाई आवास योजनेंतर्गत तत्काळ बैठक घेऊन प्रस्ताव हातावेगळे करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे़
अशी आहे योजनेची प्रक्रिया
ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांची छाननी पं़स़ अधिकाºयांमार्फत केली जाते़ त्यानंतर दिलेल्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांची निवड करून त्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविले जातात़ समाजकल्याण विभागातून या प्रस्तावांना निधी उपलब्ध करून दिला जातो़ प्रतिलाभार्थी १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात वितरित केले जाते़ त्यात पहिल्या टप्प्यामध्ये ३० हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात़ घरकूल बांधणीच्या कामाला सुरुवात केल्यानंतर दुसरा टप्पा आणि घरकूल पूर्ण झाल्यानंतर तिसºया टप्प्याचे अनुदान वितरित केल जाते़
मनुष्यबळ नसल्याने रखडले प्रस्ताव
परभणी पंचायत समितीमधील बांधकाम विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे़ केवळ एका अधिकाºयावर हा विभाग चालविला जातो़ त्यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विलंब होत आहे़ जानेवारी महिना उजाडला तरी हे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने घरकूल बांधकामास नवीन आर्थिक वर्षातच सुरुवात होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे़
या गावांमधून आले प्रस्ताव
४परभणी तालुक्यामध्ये १३१ गावे असून, ही सर्व गावे रमाई आवास योजनेसाठी पात्र आहेत़ त्यापैकी मांडाखळी, तरोडा, नांदगाव खुर्द, आलेगाव पांढरी, कारला, आर्वी, शिर्शी आदी गावातून प्रस्ताव आले आहेत़