परभणीत आढावा बैठक : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:33 AM2018-04-09T00:33:24+5:302018-04-09T00:33:24+5:30
जिल्ह्यात ७७ कोटी रुपयांच्या रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील कामे तत्काळ सुरु करावेत, अशा सूचना स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात ७७ कोटी रुपयांच्या रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील कामे तत्काळ सुरु करावेत, अशा सूचना स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २० एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहात ८ एप्रिल रोजी विविध विकासकामांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची उपस्थिती होती.
या आढावा बैठकीमध्ये लोणीकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या मागणीप्रमाणे शासनाने पाणीपुरवठ्याच्या २३ योजनांना मंजुरी दिली आहे. त्या सर्वच योजनांची तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करुन वेळेत कामे पूर्ण करावीत. या संदर्भातील सर्व अधिकार शासनाने जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले आहेत. त्या सोबतच पाथरी तालुक्यातील गुंज येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ लाख रुपये देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
या बैठकीत महानगरपालिकेच्या विविध कामांचा आढावा घेऊन अटल अमृत योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची माहिती जाणून घेतली. तसेच महावितरण मधील कामांचा आढावा घेऊन दीनदयाल उपाध्याय योजनेची स्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील ५४ कोटी रुपयांच्या पोल व केबल बदलण्याच्या नियोजित कामाचा आढावा घेतला.
या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान, समाधान शिबीर इ. बाबत अधिकाºयांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विकास कामांचे ई-भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस माजी आ.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आनंद भरोसे यांची उपस्थिती होती.