लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी):गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र २७ जानेवारी रोजी वझूर शिवारातून जप्त करण्यात आले आहे.तालुक्यातील पूर्णा व गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. याविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरु केले असून वझूर शिवारात २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. एक्सलेटर सारखे हे यंत्र असून साधारणत: ४ हजार रुपये किंमतीचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार पल्लवी टेमकर, नायब तहसीलदार निकेतन वाळे, बीजमवाड, मंडळ अधिकारी सरोदे, तलाठी पाटील यांच्या पथकाने केली. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यवाहीची प्रक्रिया सुरु होती.
परभणी : वझूर शिवारात वाळू उपसा करणारे यंत्र जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:42 AM