परभणीचा धान्य घोटाळा पुन्हा दोन्ही सभागृहांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:32 AM2017-11-28T00:32:55+5:302017-11-28T00:33:07+5:30
येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यात आले आहे़ यावेळी तरी हे प्रकरण चर्चेला येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यात आले आहे़ यावेळी तरी हे प्रकरण चर्चेला येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात ३७ जणांवर गुन्हे दाखल झाले होते़ त्यापैकी एक आरोपी मयत असून, २२ आरोपींना अटकेनंतर जामीन मिळालेला आहे़ १४ आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केली नसून त्यामध्ये ९ शासकीय अधिकाºयांचा समावेश आहे़ परभणी पोलिसांकडून हे प्रकरण चौकशी करीता हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे महिनाभरापूर्वी सोपविण्यात आले आहे़ गुंजाळ यांच्याकडून या प्रकरणी अद्याप उर्वरित आरोपींपैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही़ शिवाय महसूल विभागातही निलंबित केलेले तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे व तहसीलदार संतोष रुईकर हे दोन्ही अधिकारी शासकीय सेवेत पुनर्स्थापित झाले असून, ते बीड जिल्ह्यात सध्या कार्यरत आहेत़ या पार्श्वभूमीवर धान्य घोटाळ्याचे हे प्रकरण गतवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी उपस्थित केले होते़ त्यानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी हे प्रकरण उपस्थित केले होते तर विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आ़ सुभाष साबणे यांनी हे प्रकरण उपस्थित केले होते़ त्यावेळी झालेल्या चर्चेत आ़ साबने यांनी या प्रकरणावर सभागृहात गांभीर्याने चर्चा केली होती़ विशेषत: या प्रकरणातील एक आरोपी तथा तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते़ त्यानंतरही या प्रकरणात गांभीर्याने कारवाईच झाली नाही़