परभणी : फेर पडताळणीनंतरच याद्यांना मंजुरी देण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:30 AM2018-11-03T00:30:07+5:302018-11-03T00:30:30+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीतील विकास कामांच्या आराखड्याच्या याद्या फेर पडताळणी केल्यानंतरच मंजूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीतील विकास कामांच्या आराखड्याच्या याद्या फेर पडताळणी केल्यानंतरच मंजूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़
जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीला सादर करण्यात आलेल्या विकास कामांच्या आराखड्यांच्या (याद्यांच्या) मंजुरीचे आदेश मिळत नसल्याची तक्रार गुरुवारी जि़प़तील सत्ताधारी पदाधिकारी सदस्यांनी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे केली होती़ आता या प्रकरणात शिवसेनेच्या सदस्यांनीही शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले असून, त्यामध्ये सदस्य सचिव या नात्याने जिल्हा प्रशासनाला व जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे याद्या फेर पडताळणी करून सादर करण्याकरीता आदेशित करावे, त्यानंतरच त्यांना मंजुरी देण्यात यावी़ १६ आॅक्टोबरच्या याद्यांना मंजुरी देऊ नये, असेही या संदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे़ या संदर्भात जि़प़ सदस्या अंजली देशमुख यांनी १६ आॅक्टोबरच्या नियोजन समितीच्या बैठकीत आक्षेप पत्रही दिले होते, असेही या निवेदनात म्हटले आहे़ निवेदनावर शिवसेनेचे गटनेते राम खराबे, जि़प़ सदस्य विष्णू मांडे, राजू चापके, अंजली पतंगे, वसुंधरा घुंबरे, स्रेहा रोहीणकर, बेबीनंदा रोहीणकर, जनार्धन सोनवणे, अरुणा सोनटक्के आदींच्या स्वाक्षºया आहेत़