लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जिल्हा पातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेला जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. मात्र परभणी येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयातील रेशीम अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार ंिहंगोली येथील जिल्हा रेशीम अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र हे अधिकारी नियमित परभणी येथे येत नसल्याने मजुरांचे पेमेंट रखडले आहे. जिल्ह्यात तुती लागवड योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरही प्रशासकीय उदासिनता शेतकºयांच्या पथ्यावर पडत आहे. जिल्हाभरातील शेतकºयांचे ई- मस्टर रखडल्याने योजनेची कामे ठप्प पडत आहेत.दरम्यान, मंगळवारी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकºयांनी थेट जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय गाठून संंबंधितांना मस्टरे काढण्याची विनंती केली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याने शेतकºयांना आल्या पावली परतावे लागले. या शेतकºयांनी रेशीम अधिकाºयांच्या नावे पत्र दिले असून वेळेत ई-मस्टरची कामे झाली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कोल्हावाडी येथील ३० लाभार्थ्यांना तुती लागवडीसाठी तहसील कार्यालयातून कार्यारंभ आदेश प्राप्त झाले. त्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जिओ टॅगिंग आणि पंचनामेही करण्यात आले. मनरेगाच्या या योजनेंतर्गत शेतकºयांना तीन वर्षांसाठी कुशल आणि अकुशल पेमेंट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात शेतकºयांनी मजुरांमार्फत तुती लागवड केली. या मजुरांचे ई- मस्टर आणि नमुना नं.४ दाखल करण्यात आले; परंतु, मजुरांचे पेमेंट रखडले आहे. गेल्या दहा दिवसांपासून रेशीम अधिकारी कार्यालयामार्फत मजुरांच्या पेमेंटसाठी शिफारसपत्र पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे मजुरांचे पेमेंट रखडले आहे. परिणामी मजुरांच्या पेमेंटचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रश्न मार्गी लावा -बंडू जाधवरेशीम उत्पादक शेतकºयांचा प्रश्न खा.बंडू जाधव यांनी उचलून धरला असून जिल्हाधिकाºयांना याबाबत पत्र पाठवून शेतकºयांच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड केलेल्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशीम अधिकारी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने मस्टर पेमेंट तसेच इतर कामे रखडली आहेत. या ठिकाणी रेशीम अधिकाºयांसह तांत्रिक सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन मस्टर पेमेंट व इतर रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी खा.जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
परभणी : ई-मस्टरअभावी रेशीम लागवड आली धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:04 AM