परभणी : सोयाबीनची गंजी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:21 AM2018-10-23T00:21:15+5:302018-10-23T00:21:55+5:30
जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
निवळी बु. येथील शेतकरी राजेभाऊ मुंजाजी खिस्ते यांनी आपल्या गट नंबर १८४, १८८ मधील चार एकरमध्ये असलेले सोयाबीन कापून त्याची गंजी लावली होती. २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अचानक बाजूला असलेल्या महावितरणची विद्युत तार खाली पडली. या दरम्यान झालेल्या शॉर्टसर्किटमुळे जवळच असलेल्या गंजीने पेट घेतला. यामध्ये संपूर्ण गंजी जळून खाक झाली. यामध्ये शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. खोले यांनी भेट दिली. या घटनेचा पंचनामा तलाठी बालाजी नागदे यांनी केला. दरम्यान, झालेल्या नुकसानीची मदत देण्यात यावी, अशी मागणी रामभाऊ खिस्ते यांनी तहसीलदार व महावितरण कंपनीकडे केली आहे.
याबाबत बोरी पोलीस ठाण्यात प्रताप खिस्ते यांच्या तक्रारीवरून महावितरण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी अल्प पावसामुळे सोयाबीनच्या पेरणीचा खर्च उत्पादनातून निघत नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच अशा घटना घडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.