परभणी : थकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:10 AM2018-11-04T00:10:02+5:302018-11-04T00:10:54+5:30
गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
जिल्ह्यातील शेतकºयांना गतवर्षी नुकसान होऊनही रिलायन्स विमा कंपनीकडून मदत मिळाली नाही़ या संदर्भात सातत्याने शेतकºयांच्या वतीने थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी आंदोलन करण्यात येत आहे़ याच मागणीसाठी २९ आॅक्टोबरपासून पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर शेतकरी संघटनेचे गणेशराव जोगदंड, माऊली कदम, विश्वंभर गोरवे, माऊली जोगदंड, अनंतराव कदम, किशनराव मुलगीर, किरण चक्रपाणी आदींनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे़ या पार्श्वभूमीवर पुण्यातील शेतकºयांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा येथे सर्व शेतकºयांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला़
यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ जवळपास एक तासाच्या आंदोलनानंतर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाडळकर यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा केली़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात अमृतराव शिंदे, किशोर ढगे, प्रभाकर शिंदे, विठ्ठल गाडगे, आकाश काळदाते, गोपाळ काळदाते, कल्याणराव लोहट, नवनाथ मोरे, विकास भोपाळे, दादाराव कांबळे, जि़प़ सदस्य जनार्धन सोनवणे, बापूराव खिल्लारे आदींनी सहभाग नोंदविला़ यावेळी सुरेश वरपूडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़