परभणी: निवडणुकीसाठी पावणेपाचशे वाहनांचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:46 PM2019-10-09T23:46:13+5:302019-10-09T23:46:41+5:30
विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़
विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला आहे़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर चारही विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे़ उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रचाराला लागले असून, प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या पूर्व तयारीला लागले आहेत़ जिल्ह्यात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे़ त्यासाठी चारही मतदार संघात मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्ह्याच्या ठिकाणावरून तालुक्याच्या ठिकाणी आणि तालुक्यापासून मतदान केंद्रापर्यंत मतदान यंत्रासह त्या केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाºयांची वाहतूक करणे, मतदान आटोपल्यानंतर मतदान यंत्र स्ट्राँग रुमपर्यंत आणून ठेवणे या कामांबरोबरच मतदान साहित्याची ने-आण करण्यासाठी प्रशासनाला वाहनांची आवश्यकता असते़ चारही विधानसभा क्षेत्रातून अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे वाहनांची मागणी नोंदविली होती़ या मागणीवर चर्चा करून चार विधानसभा मतदार संघासाठी करार तत्त्वावर वाहने घेण्यात आली आहेत़
जिंतूर विधानसभा मतदार संघात क्षेत्रीय अधिकाºयांसाठी ४५ वाहने घेण्यात आली आहे तर मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी १२ जीप आणि ३४ क्रूझरची व्यवस्था करण्यात आली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघात क्षेत्रीय अधिकाºयांसाठी ३९ वाहने त्याच प्रमाणे मतदान केंद्रांसाठी ५१ जीप घेण्यात आल्या आहेत़ गंगाखेड विधानसभा मतदार संघात क्षेत्रीय अधिकाºयांसाठी ४१ वाहने तसेच मतदान केंद्रांसाठी १५ जीप आणि १० क्रूझर वाहन मालकांसमवेत करार करण्यात आला आहे़ जिंतूर पाथरी विधानसभा मतदार संघासाठी क्षेत्रीय अधिकाºयांना ३८ वाहने याशिवाय २४ क्रूझर नियुक्त करण्यात आल्या आहेत़
एकूण ४९३ वाहने या निवडणुकीसाठी करार तत्त्वावर घेतली आहेत़ त्यामध्ये झोन अधिकाºयांसाठी १६३ तसेच मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी ७८ जीप आणि ६८ क्रूझर वाहने त्या त्या विधानसभा मतदार संघाला प्रदान करण्यात आली आहेत़
१२९ बस, ३६ मिनी बसचा होणार वापर
४खाजगी वाहनांबरोबरच जिल्हा प्रशासनाने राज्य परिवहन महामार्ग विभागाकडे १२९ बस आणि ३६ मिनी बसचाही करार केला असून, ही वाहने देखील निवडणूक काळात वापरली जाणार आहेत़
४त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघासाठी ३७ बस, ४ मिनी बस़ परभणी ५ बस, २२ मिनी बस़ गंगाखेड ३७ बस, ८ मिनी बस आणि पाथरी विधानसभा मतदार संघासाठी ५० बस आणि २ मिनी बस वापरण्यात येणार आहेत़
४तसेच ईव्हीएम मशीनसाठी १३ वाहने राखीव ठेवण्यात आली आहेत़ त्यामध्ये जिंतूर मतदार संघात ४, गंगाखेड मतदार संघात ४ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात ५ वाहनांचा समावेश आहे़