परभणी : विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात रोडरोमिओला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:49 AM2018-12-16T00:49:39+5:302018-12-16T00:50:38+5:30

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काहीही काम नसताना रस्त्याने गोंधळ करीत विद्यार्थिनीची छड काढणाºया एका रोडरोमिओला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी पकडून बेदम चोप दिला़

Parbhani: Students' organization officials have turned to roadromy in the university | परभणी : विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात रोडरोमिओला बदडले

परभणी : विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात रोडरोमिओला बदडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काहीही काम नसताना रस्त्याने गोंधळ करीत विद्यार्थिनीची छड काढणाºया एका रोडरोमिओला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी पकडून बेदम चोप दिला़
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रोडरोमिओंची गेल्या काही दिवसांपासून वर्दळ वाढली आहे़ या प्रकरणी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारीच राज्य शासनाकडे तक्रार केली होती़ त्यामध्ये कृषी विद्यापीठ प्रशासन व कृषी महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत नाही़ येथे रोडरोमिओ व बाहेरील व्यक्तींचा उपद्रव वाढला असून, विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते़ त्यानंतर शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कृषी विद्यापीठ परिसरात एक रोडरोमिओ जोराने ओरडत फिरत असल्याचे दिसून आले़ तसेच त्याने एका विद्यार्थिनीची छेड काढली. याबाबत त्यांना कृषी विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी ओमप्रकाश शिसोदिया, अनिल आडे, विजय सावंत आदींनी विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला व त्यानांच उद्धट बोलू लागला़ त्यानंतर या रोडरोमिओला उपस्थित पदाधिकाºयांनी बेदम चोप दिला़ त्यानंतर घटनास्थळी विद्यापीठातील सुरक्षा अधिकाºयास बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्याला त्याच्या हवाली करण्यात आले.
टोल फ्री नंबर सुरू करण्याची मागणी
कृषी विद्यापीठात विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत़ त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कृषी विद्यापीठाने टोल फ्री नंबर सुरू करावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी ओमप्रकाश शिसोदिया, अनिल आडे, विजय सावंत यांनी केली आहे़

Web Title: Parbhani: Students' organization officials have turned to roadromy in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.