लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): येथील रेल्वेस्थानकावर सुरक्षा बलाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी अचानक तपासणी करण्यात आली़रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे पथक सकाळी ७ वाजेच्या सुमारास पूर्णा रेल्वेस्थानकावर दाखल झाले़ स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली़ तसेच रेल्वेमधील पार्सल, प्रवाशांची तपासणीही करण्यात आली़ श्वान पथकाने संपूर्ण रेल्वेस्थानकाची तपासणी केल्याने प्रवाशांना ही तपासणी कशासाठी केली जात आहे, याची माहिती मिळू शकली नाही़ त्यामुळे संभम्र अवस्था निर्माण झाली होती़ सकाळी ७ वाजेपासून सुरक्षा अधिकाऱ्यांचा ताफा पूर्णा रेल्वेस्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करीत होता़ केवळ सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी केल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले़ यावेळी सुरक्षा बलाचे निरीक्षक मुकेश कुमार, कर्मचारी शेख जावेद, मारोती नवाडे, मगर, बालाजी कासटवार आदींची उपस्थिती होती़
परभणी : पूर्णा रेल्वेस्थानकाची अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:52 AM