लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील नांदखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत तंबाखूची प्रतिकात्मक होळी करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला़या कार्यक्रमास शिक्षण सभापती अंजली आणेराव, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, शिक्षणाधिकारी डॉ़ सुचिता पाटेकर, लक्ष्मण पुरणवार, सरपंच अशोक जोंधळे, उपसरपंच संजय साखरवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती़ मंगळवारी सकाळी या कार्यक्रमास प्रारंभ झाला़ जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे़ तालुक्यातील नांदखेडा शाळेतही या अंतर्गत तंबाखूची प्रतिकात्मक होळी करण्यात आली़ त्यानंतर तंबाखूपासून होणाऱ्या आजारांची माहिती देवून तंबाखू सेवन करू नये, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात तंबाखू खाणाºया व्यक्तींना त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले़ शिक्षण सभापती अंजली आणेराव, शिक्षणाधिकारी डॉ़ सुचिता पाटेकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तंबाखूची प्रतिकात्मक होळी करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़फलकही लावला४याच उपक्रमांतर्गत नांदखेडा येथील जि़प़ शाळेच्या संरक्षक भिंतीवर ‘आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक लावण्यात आला असून, या शैक्षणिक इमारतीच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस व सेवनास बंदी आहे़ असे आढळल्यास ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असा इशारा या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे़
परभणी : नांदखेडा शाळेत तंबाखूची प्रतिकात्मक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 12:53 AM