परभणी : वाहतूक ठेकेदारांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:10 AM2018-10-12T00:10:16+5:302018-10-12T00:11:56+5:30
साखर कारखानदारांच्या मनमानी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी वसमत रस्त्यावरील नांदगाव गावाजवळ रास्तारोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: साखर कारखानदारांच्या मनमानी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी वसमत रस्त्यावरील नांदगाव गावाजवळ रास्तारोको आंदोलन केले.
साखर कारखानदारांच्या ऊस वाहतुकीच्या धोरणामुळे वाहनमालकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक ठेकेदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम, माणिक भालेराव, भगवानराव धस, शामराव बेंडे, रमेशराव धस, विलासराव देसाई, पांडुरंग पिसाळ, पांडुरंग वंजे, विनायक धस, ज्ञानेश्वर भालेराव, चंपती सावंत, बालाजी सवराते आदींसह बहुसंख्य वाहतूकदार सहभागी झाले होते.